नागपूरच्या निर्बंधबाबतीत आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
7

‘सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या कुठे वाढत आहे? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत,’ असं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं आहे

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचं पालन करावंच लागेल तरंच तिसरी लाट रोखता येईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी  शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here