नागपूर दिनांक 24 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टेंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत.
गुरुवारी २५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता दक्षिण नागपूरमधील लाभार्थ्यांना रेशीमबाग मैदानात केंद्रीय मंत्री, सड़क परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील ३५,१३६ लाभाथ्र्यांची नोंदणी करण्यात आली आहे यांना रु. ३५ कोटीचे २,३४,७८१ उपकरण वितरीत केले जाणार आहे.
गुरुवारी (२५ ऑगस्ट) फक्त दक्षिण नागपुरातील ९०१८ लाभार्थ्यांना (अडीप – ८५४, वयोश्री ८१६४) एकूण ६८.६८३ साहित्य, उपकरणे (अडीप- १७३१, वयोश्री- ६६९५२) वितरित करण्यात येणार आहेत. या उपकरणांचा एकूण खर्च ९.१९ कोटी एवढा खर्च आहे. तसेच इतर लाभार्थ्यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रनिहाय उपकरणाचे वितरण केले जाणार आहे. याची अगाऊ सूचना नागरिकांना देण्यात येईल.
दक्षिण नागपुरातील लाभार्थ्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे उपस्थित राहतील. तर महाराष्ट्र शासनाचे सचिव मनु कुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना- बिदरी, पोलीस आयुक्त मुख्य अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी.,जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश उपस्थिती असेल.
सहाय्यक साधने वितरणाला दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपुर यानी केले आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
बॉकिंग स्टिक
श्रवण यंत्र
एल्बो कक्रचेस
व्हीलचेअर
ट्रायपॉड्स क्वॅडपॉड
कृत्रिम मडेंचर्स
स्पेक्टल्स
क्वॅकपॉड
स्पेक्टल्स
एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
वॉकिंग स्टिक
एल्बो कक्रचेस
एझलरी कक्रचेस (कुबडे)
कृत्रिम अवयव
श्रवण यंत्र
ट्रायपॉड्स
क्वैडपोड
व्हीलचेयर
ट्रायसिकल (मॅन्युअल)
ट्रायसिकल (बॅटरी)
कॅलीपस
TLM कीट
ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)
स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता) डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)
स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)






