देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाले तर आनंद होईल :अमृता फडणवीस

0
14

महाराष्ट्र दिनांक 20 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले व देवेंद्र फडणवीस यांची भाजपा निवडणूक मंडळात वर्णी लागली

दिल्लीत फडणवीसांचं वजन वाढलं अशा चर्चा होत असताना पुण्यातील आखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं फडणवीसांनी पुण्यातून लोकसभेची निवडणुक लढवावी असं पत्र त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं आहे. मात्र अजूनही पालकमंत्र्यांची निवड तसेच बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कऱण्यात आला नाही. त्यावरून आता फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मतदारसंघही नागपूर आहे. पण आता ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात. पुणे माझं आजोळ आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते, वेळ मिळते, तेव्हा मी पुण्याला येते. देवेंद्र सध्या नागपूरचे पालकमंत्री आहे. त्यामुळे ते नागपूर आणि पुण्याचे पालकमंत्री झाले तर मला नक्की बघायला आवडेल

भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या काळात पुण्यातील पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलं होतं. चंद्रकांत पाटील मुळात कोल्हापुरचे असल्याने पुण्यात भाजपचे दोन गट बघायला मिळत आहेत. त्यावरून पुण्यात सध्या चंद्रकांत पाटलांबाबत आलबेल नाही. त्यामुळे पुण्यातील पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस हे स्वत: कडे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन भाजप पुण्यातील पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच महापालिकेत देखील सत्ता राखण्यासाठी भाजप मोठी रणनिती आखण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून पुण्यातील महापालिकेची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला महापालिकेची निवडणुक चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here