खा. बाळू धानोरकरांविरुद्ध भाजपा युवा मोर्चा ने पोलीस स्टेशनला केली तक्रार

0
21

नागपूर दिनांक 17 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजा संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा ने आज पोलिसांकडे तक्रार दिली आहे

13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते… त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून *पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून बाळू धानोरकर विरोधात उचित कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा ने केली आहे…

काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 13 ऑगस्ट रोजी  बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे, ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते असे वक्तव्य केले होते, धानोरकर यांनी त्यांच्या वक्तव्यातून जातीय विद्वेष निर्माण होईल असे प्रयत्न केल्याचा भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप आहे

फडणवीस यांनी नागपुरात अनेक ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांना ही पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या असून भाजपमध्ये कधीही जबाबदारी देताना जात पाहिली जात नाही असा दावा तक्रार करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here