आज जिल्ह्यातील दारुची दुकाने बंद

0
8

नागपूर दिनांक 9 ऑगस्ट ( प्रतिनिधी )

जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी मोहरम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने स्थापन झालेल्या सवाऱ्या, ताजिये, नवसाचे ताजीये, दुलदुल, ताटी इत्यादी विसर्जन होत असतात.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दुष्टीने जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी दारु विक्रीच्या अनुज्ञप्त्या 9 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील तहसिल, पाचपावली, यशोधरानगर, नंदनवन, कामठी, इमामवाडा, सक्करदरा, लकडगंज, गिट्‌टीखदान, कोतवाली या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे संपूर्ण क्षेत्रातील अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मोहरम सणानिमित्त बंद राहील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद आहे. 00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here