काल एकनाथ खडसे यांनी माझी ईडीची चौकशी सुरू आहे त्यामुळे मी म्हटल्यानुसार योग्य वेळ आल्यावर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, ईडी अन् सीडीचा विषय आता बोअर झाला आहे, आमची ईडी तर चालली आहे, तुमची सीडी तर दाखवा. सीडी बाहेर येईल का नाही ते नेत्यांनाच विचारा? ते म्हणताहेत चौकशी करताहेत, तपासताहेत त्यामुळे आता समजेल योग्य वेळ कोणाची येते ते? अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंचे नाव न घेता टोला लगावला





