नागपूर दिनांक 9 जुलै ( महानगर प्रतिनिधी)
या वर्षातील आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, तसेच भविका व वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून सुट देण्यासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी 7 जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे.
पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरहूहून येते वेळी म्हणजेच 7ते 15 जुलै या कालावधीसाठी ज्या वाहनांमधून पालख्या, भाविक व वारकरी जाणार आहेत अशा वाहनांना पथकरातून सुट मिळण्यासाठी स्टिकर्स परिवहन विभागाकडून जारी करण्याबाबत निर्देशित आहेत.
त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर(शहर) येथे तळ मजल्यावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी व वारकऱ्यांनी पथकरातून सुट मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांचेकडे सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवाहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.






