मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पदभार स्वीकारला, निर्मला सीतारामन सोबत होणार बैठक

0
15

महाराष्ट्र दिनांक 7 जुलाई ( प्रतिनिधी )

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात दाखल होताच त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन केले.

एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात दाखल झाल्यानंतर सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीबाबत दीपक केसरक (Deepak Kesarak) यांनी माहिती दिली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकास कांमासाठी निधी संदर्भात चर्चा होऊ शकते असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना केसरकर यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here