नागपूर (प्रतिनिधी) : मारवाडी युवा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल लखोटिया, प्रांतीय अध्यक्ष उमेश पंचांरिया, राष्ट्रीय सहाय्यक मंत्री रामकिशोर वर्मा, राष्ट्रीय संयोजक जनसंपर्क उमेश मांडोत, आदी मान्यवरांच्या नागपूर शहरात प्रथम आगमनानिमित्त मारवाडी युवा मंच नागपूर द्वारा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाचे आयोजन मारवाडी युवा मंच नागपूर द्वारा करण्यात आले होते.यावेळी प्रामुख्याने भूतपूर्व अध्यक्ष निशांत गांधी, अतुल कोटेचा, विश्वजीत भगत, अखिल मंत्री, संजय पालीवाल, विक्रम पालीवाल, शरद राठी, सुरेश गांधी, अश्विन अग्रवाल (सी ए), गिरीश नात्थानी, सुनील कर्वा, आदित्य भैया, विजय जोशी, ओमप्रकाश मंत्री, हरीश बंग, राजू अग्रवाल, पंकज दालमिया, राजू शर्मा, गोविंद राठी, चौरसियाजी, संजय लोया, ओमभैय्या ,मयंक अग्रवाल, अनिल मंत्री, निखिल मंत्री, आशिष मुकीन (सी ए ) आदी सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर बाहेती, यांनी केले, प्रास्ताविक सचिव कन्हैया मंत्री यांनी तर आभार भूतपूर्व अध्यक्ष अजय मल यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष राजेश अग्रवाल, सचिव कन्हैया मंत्री, कोषाध्यक्ष दीपक अग्रवाल आदींसह मारवाडी युवा मंच नागपूर च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





