शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 99 वाढदिवस… आज ते 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब ठाकरे हजेरी लावायचे. त्यांच्या बरोबर ते राज ठाकरे यांना देखील घेऊन जायचे. बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुण्या-मुंबईत भेटीही व्हायच्या. यावेळीही राज ठाकरे सोबत असायचे. एकंदरित बाबासाहेबांचं व्यक्तीमत्व राज ठाकरे यांना विशेष भावतं. राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर विशेष मुलाखत घेतली होती.





