नागपूर : सोमवारी मनपा केन्द्रांमध्ये मर्यादित स्वरूपात लसीकरण

0
9

नागपूर, ता.२५ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी मर्यादित स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे मर्यादित स्वरूपात लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर सोमवारी २६ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केन्द्रात गर्दी करु नये. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल.

सध्या नागपूर मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत, ही माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली. ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजे पर्यत होईल.

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here