राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ,पाहा कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज,येलो अलर्ट

0
9

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे – यामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यात मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे

त्यानुसार पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अ‌लर्ट जारी केला आहे – असा इशारा भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे

*कशी आहे पुढील स्थिती ?*

● *आज 22 जुलै रोजी* – सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌लर्ट देण्यात आला आहे – तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून – नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे

● *23 जुलै रोजी* – सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून – यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे

● *24 जुलै रोजी* – राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे – तर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here