“हिरोज ऑफ नागपूर” आठ नामवंतांच्या प्रतिमेचे अनावरण

0
15

नागपूर महानगर पालिका तथा नगरसेवक निशांत गांधी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील (हिरोज ऑफ नागपूर)ए.बी.बर्धन, कवी ग्रेस, सुमतीताई सुकळीकर, मा.गो.वैद्य, जांबुवंतराव धोटे, बापूजी अणे, डॉ.बी.एस.चौबे, मौलाना अब्दुल करिम पारेख या आठ नामवंतांचे GPO रोड वर मुख्यमंत्री सचिवालय जवळ स्मारक व प्रतिमेचे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डाॅ.श्री.महात्मे आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके माजी खासदार अजय संचेती,मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. आदी उपस्थित होते.

विदर्भवीर विदर्भसिंह माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या प्रतिमेचे अनावरणाला त्यांच्या कन्या रा का पा नेत्या ज्वाला जांबुवंतराव धोटे व भाऊंचे अनेक आप्तजन प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here