गणेशोत्सवासाठी रेल्वेद्वारा 72 स्पेशल गाड्यांची घोषणा

0
13

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे महाराष्ट्र सरकार आव्हान करत असताना ही मध्य आणि कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ७२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल येथून सावंतवाडी रोड/रत्नागिरीसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (रोज ३६ विशेष), सीएसएमटी ते रत्नागिरी द्वीसाप्ताहिक (१० विशेष), पनवेल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून तीनवेळा (१६ विशेष )आणि पनवेल ते रत्नागिरी (१० विशेष) या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. ५ ते २९ सप्टेंबरपर्यंत या गाड्या धावतील.

अधिक माहितीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सर्व गाड्यांचे आरक्षण गुरुवार, ८ जुलैपासून सुरू होणार असून प्रवाशांनी प्रवासी आरक्षण केंद्र तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here