येलचिली गावाजवळ भीषण अपघात ; तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यु: पिकअप वाहनाची दुचाकीला जबर धडक !!

0
36

आलापल्ली, ता. २४ जून – आलपल्ली – एटापल्ली मुख्य रस्त्यावरील येलचिल गावाजवळ सोमवारी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. एका भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, या भीषण धडकेत तीन वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

मृत मुलीचे नाव आरोही विशाल काळे असे आहे. अपघात घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गावात शोककळा पसरली आहे.

या अपघातात दुचाकीवरील इतर सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here