आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत:एकनाथ शिंदे

0
19

महाराष्ट्र दिनांक 29 जून ( प्रतिनिधी)

आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते.

त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते काही परत आले नाही. त्याच दिवशी 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे.पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही. असाच प्रकार 2019 झाला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळे उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here