30 जून पर्यंत मालमत्ता कर भरल्यास 10 टक्के सूट

0
15

नागपूर दिनांक 28 जून ( महानगर प्रतिनिधी)

नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 30 जून 2022 पर्यंत चालू आर्थिक वर्षाकरीता असलेली संपूर्ण मालमत्ता कर रक्कम आगाऊ स्वरुपात मनपा निधीत जमा करणा-या मिळकतदारास मालमत्ता कर रक्कमेत (शासनाचे कर वगळून) 10 टक्के सूट मिळणार आहे.

1 जुलाई 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत चालू आर्थकि वर्षाकरीता असलेली संपूर्ण मालमत्ता कर रक्कम आगाऊ स्वरुपात मनपा निधीत जमा करणा-या मिळकतदारास मालमत्ता कर रक्कमेत (शासनाचे कर वगळून) 5 टक्के सूट दिली जाईल. मनपा उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी या संधिचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम १४० अन्वये मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मनपाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here