29 जून रोजी जिल्हा परिषदेत पेंशन अदालत

0
12

नागपूर दिनांक 24 जून (प्रतिनिधी)

मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालतीचे आयोजन जिल्हा परिषदेतील कै. आबासाहेब खेडकर सभागृह येथे 29 जून रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास पेंशन अदालतीमध्ये उपस्थित रहावे. 29 जून रोजी सकाळी 9.15 ते 10.15 वाजेपर्यंत टोकन वाटप करण्यात येणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here