नागपूर दिनांक 17 मई ( महानगर प्रतिनिधी)
नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असून शहरातील अनेक भागात कमी दाबाच्या पाणी पुरवठयामुळे वीशेष करून दक्षिण नागपूर उत्तर भाग, पश्चिम नागपूर, पूर्व नागपूर या काही भागात पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने तसेच ओ.सी. डब्ल्यू कंपनीकडून शहरात टील्लू पंपसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होत असतांना दिसत नाही, अनेक लोक सर्रासपणे टिल्लुपंपाद्वारे पाणीचोरी करीत असून अनेक ठिकाणी पाण्याचे मीटर काढून पाणीचोरीचे प्रमाण वाढलेले आहे
नेटवर्क असलेल्या भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ओ.सी. डब्लु. ची असून जेथे अपुरा पाणीपुरवठा होतो तेथे टँकर पुरविण्याची जबाबदारी ही त्या कंपनीची आहे, मात्र टँकरची संख्या वाढविण्यात कंपनीव्दारे चालढकल करण्यात येत असून अनेक भागात टँकर अभावी पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शहरात दरवर्षीप्रमाणे होणान्या विहीरांची सफाईही अद्यापही झाली नसून शहरात मोठ्या प्रमाणात म.न.पा. च्या विहीरी आहेत, तसेच या वर्षी नवीन बोरवेल खोदण्याचे काम अद्यापही हाती घेतले नाही. एकंदरीत येत्या काही दिवसात पावसाळ्याचे दिवस बघता अद्यापही नालेसफाई झालेली नसून अनेक पावसाळी नाल्या स्वच्छ करण्याचे काम म.न.पा. प्रशासनाव्दारे करण्यात आलेले नाही.
एकंदरीत स्थिती लक्षात घेता या सर्व प्रकारामुळे येत्या पावसाळयात मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याच्या प्रकारात वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहे. ४ मार्च ला नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाची सर्व जबाबदारी प्रशासक/ आयुक्तांवर आलेली असून संपूर्ण प्रशासन उन्हाळयात असलेली पाणी टंचाई तसेच भविष्यातील पावसाळयाची पूर्व तयारी या दोनही बाबतीत असफल ठरलेली असून याचा संपूर्ण परिणाम नागपूरकर जनतेला सहन करावा लागणार आहे.
पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून हा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके आणि संदीप गवई यांनी दिला






