बुध्द पोर्णिमा दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद

0
9

नागपूर दिनांक 10 मई ( महानगर प्रतिनिधी)

“बुध्द पोर्णिमा” दिनानिमित्त सोमवार दिनांक 16 मे, 2022 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या साधारण सभेतील मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार सोमवार दिनांक 16 मे, 2022 ला “बुध्द पोर्णिमा” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.

जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग म.न.पा.यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here