बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस आमदार एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देणार

0
14

राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि संसाधनाची खरीदी  या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे

बाळासाहेब थोरात म्हणाले सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन थोरात यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here