काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन

0
13

काँग्रेसचे नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे करोनामुळं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here