शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया, तोंडातील अल्सर काढला

0
8

पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळून आला होता. आज तो अल्सर काढण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती देताना सांगीतले,शरद पवारांची तब्येत चांगली असून ते रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावाही ते घेत आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरु करतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here