ठाकरे सरकारने सिरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकतीच सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली
18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिल्यामुळे 5.5 कोटी लसीची गरज नव्याने निर्माण झाली आहे,महाराष्ट्राला 20 कोटी लसींची गरज आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी अदर पुनावाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला 50 टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करुन विकत घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने आता महाराष्ट्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.





