कोव्हिडचा नवा स्ट्रेन घातक( more contiguous ) आहे. त्यातच नागरिकांचे बेजबाबदार वागणे चिंता वाढविणारे आहे. कोव्हिड संदर्भातील नियमांचे उल्लंघन हेच रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
आपले स्वत:चे बेजबाबदार वागणे हे आपल्यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालणारे ठरू शकते. त्यामुळे मी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. यासाठी माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती ‘पॉझिटिव्ह’ आहे, असे गृहीत धरूनच वागायला हवे.
कोव्हिडची त्रिसूत्री आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती झाली आहे. फक्त आता ती अंगवळणी पाडायला हवी. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करायलाच हवा. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवायलाच हवे अथवा सॅनिटाईझरचा वापर करायलाच हवा आणि एकमेकांपासून सामाजिक अंतर ठेवायलाच हवे. ही त्रिसूत्री म्हणजेच सुदृढ आणि कोरोनामुक्त आरोग्याचा खरा मंत्र आहे. या सवयींना आयुष्याचा भाग बनवा आणि निरोगी राहा.






