महापौर दयाशंकर तिवारीच्या विनंतीमुळे देशात तीन लाख रेमडिसीवीर उपलब्ध*

0
6

*नागपूर:* केंद्र शासनाने रेमडिसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कोरोनाच्या महासंकटात देशातील रुग्णांसाठी तीन लाख इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्यातबंदीनंतरचा माल भारतीय बाजारात विकण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्राकडे केली होती.

यासंदर्भात माहिती देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, यासंदर्भात व्हाट्सअप्प वर एक माहिती प्राप्त झाली की केंद्र सरकारने रेमडिसीवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र या उत्पादकांना केवळ निर्यातीची अनुमती होती. उत्पादित माल भारतीय बाजारात विकण्याची परवानगी नव्हती.यामुळे निर्यात बंदी नंतर इंजेक्शन उत्पादक कंपनीकडे मोठ्या संख्येत इंजेक्शन असेल आणि त्याला परवानगी मिळाली तर त्याचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी होऊ शकेल, हे लक्षात घेऊन आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तसेच केंद्र सरकारलाही पत्र लिहून इंजेक्शनला देशात विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.

महापौरांच्या या विनंतीही दखल घेत केंद्र सरकारने कोरोना रुग्णांच्या हिताचा निर्णय घेतला, यामुळे कोरोना रुग्णांचे जीव वाचू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here