राज्यात बुधवारपासून १५ दिवस संचारबंदी- मुख्यमंत्री

0
14

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले उद्या संध्याकाळी आठ वाजल्यापासून आपल्या राज्यात निर्बंध लागू होतील. पुढील १५ दिवस संचारबंदी असेल. घराबाहेर निघायचं नाही. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

इतर सेवा बंद राहतील. सकाळी सात ते रात्री 8 सकाळी या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, त्या चालू ठेवणार आहोत. एक गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही. लोकल बंद राहणार नाही, बस सेवा बंद करत नाही. मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतिआवश्यक कामासाठी वापरले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य सेवा बंद, लोकल, बस सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार – मुख्यमंत्री

निवासी आणि प्रवासाची सोय असेल तर बांधकाम सुरू ठेवता येणार –

बँक, शेअर बाजार, पेट्रोल पंप, औषध दुकान, दवाखाने सुरू राहणार

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here