मध्यवर्ती कारागृहात पुन्हा करोनाचा उद्रेक

0
11

मध्यवर्ती कारागृहात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला असून, कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारागृहात बंदी असलेल्या फाशीच्या कैद्यांसह नऊ जणांना करोनाची बाधा झाली आहे. यात एका तुरुंग रक्षकाचाही समावेश आह

दोन दिवसांपूर्वी २० कैद्यांना लस देण्यात आली. कैद्यांचे लसीकरण सुरू असतानाच एका कैद्याची प्रकृती खालावली. त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी आणखी सात कैद्यांची प्रकृती खालवली. त्यांचीही तपासणी करण्यात आली. सर्व करोनाबाधित असल्याचा अहवाल आला. याशिवाय एक अधिकारीही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

रविवारी या सर्वांना उपचारासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कारागृहातीलच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here