डिस्चार्ज पूर्विच सलाईनच्या नळीने कोव्हिड वॉर्डमधील रुग्णाची आत्महत्या

0
11

अकोल्यातील शासकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक दहामध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

अकोल्यातील पातूरमधील रहिवासी असलेल्या 57 वर्षीय रुग्णावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कोरोनाची बाधा झाली होती. शनिवारी त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केली आहे.

या रुग्णाने नेमकी आत्महत्या का केली, याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याने कॅन्सरच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here