३१ मार्चपर्यंत एकमुस्त वापरशुल्क भरणाऱ्या परवानेधारकांना मिळणार शास्तीमध्ये सूट

0
13

नागपूर, ता. 23 मार्च (प्रतिनिधी) :

नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागांतर्गत येणाऱ्या परवाने धारकांद्वारे येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत थकीत आणि चालू वर्षाचे वापरशुल्क एकमुस्त भरल्यास त्यांना शास्ती मध्ये सूट देण्याचा महत्वाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार बाजार अधीक्षकांद्वारे यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे.

मनपाच्या बाजार विभागा अंतर्गत येणारे दुकाने, ओटे किंवा जागांच्या वापरसाठी मनपाकडून वापरशुल्क आकारण्यात येते. हे वापरशुल्क वेळेवर न भरल्यास त्यावर विलंब शुल्क म्हणून शास्ती लावण्यात येते. या शास्तीमध्ये सूट मिळण्यासंदर्भात परवानाधारकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २१ मार्च २०२२ रोजी मंजूरी आदेश जारी केले.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता ३१ मार्चपर्यंत थकीत व चालू वापरशुल्क एकत्रित भरणा-या मनपाच्या परवानाधारकांना शास्तीत सूट मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here