महाराष्ट्र दिनांक 19 मार्च (प्रतिनीधी)
महाराष्ट्रात भाजपाला पराभूत करण्यासाठी एमआयएमने महविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएमसोबतच्या युतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही, असे राऊत म्हणाले.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली. हे सर्व पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. यातच जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
एमआयएम हे भाजपची बी टीमच आहे. याची प्रचीती त्तरप्रदेश आणि बंगालमध्ये पाहायला मिळाली. ज्यांचे आदर्श औरंगजेब आहेत. ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. अशा पक्षांशी महाविकास आघाडी कधीच हातमिळवणी करणार नाही.
आमची कोणतीही छुपी किंवा उघड युती होवूच शकत नाही. ज्यांच्याशी त्यांची छुपी युती आहे ती त्यांची त्यांना लखलाभ असे म्हणत संजय यांनी राऊत एमआयएमशी युतीच्या चर्चा फेटाळून लावल्या.






