जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी लसिकरण पुर्ण करा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

0
5

यवतमाळ दि. 17 मार्च, (प्रतिनिधी) :

12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याच्या कोविड लसीकरणाला सुरुवात

जिल्ह्यात कोरोना लसचा पहिला डोस 90 टक्के व दुसरा डोज 60 टक्के पुर्ण झाला आहे. आता 12 वर्षावरील बालकांच्या लसिकरणाला शासनाने परवानगी दिल्याने आजपासून नियमित लसिकरणासोबतच 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचेही लसिकरण सुरू करण्यात येत आहे. तरी पालकांनी आपल्या 12 वर्षावरील बालकांचे लसिकरण पुर्ण करावे तसेच ज्यांचा पहिला व दुसरा डोज अद्यापही बाकी आहे त्यांनी देखील आपले लसिकरण पुर्ण करून घ्यावे आणि जिल्हा कोरोमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी आपले लसिकरण पुर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

लसीकरणाच्या सहाव्या टप्यात आता शासना मार्फत 12 ते 14 वयोगटातील बालकांचे कोविड लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने यवतमाळ येथील शंकरलाल कोठारी विद्या मंदीर या शाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रमुख उपस्थितीत कु. प्राची गुल्हाणे वर्ग 7वा या विद्यार्थिनीला लस देउन या लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संजय पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नांवदीकर, वैद्यकीय अधिकारी संजना लाल, संस्थेचे सचिव डॉ अनुप कोठारी, मुख्याध्यापिका अर्चना कोठारी तसेच शाळेतील लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही, नागरिकांनी कोविड त्रिसुत्रीचे पालन करावे व कोविडवरील परिणामकारक शस्त्र लसिकरण असून ते पुर्ण करावे. 12 वर्षावरील मुला-मुलींनी ही लस घ्यावी तसेच पालक किंवा ओळखीतील व्यक्तींनी जर लस घेतली नसल्यास त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे त्यांनी बालकांनी सांगीतले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की 12 ते 14 वयोगटासाठी कार्बोव्हॅक्स लस ही भारतात निर्माण करण्यात आली असून ही अतिशय सुरूक्षित असल्याचे सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रास्ताविक भाषणातून जिल्हात 12 ते 14 वयोगटातील 92 हजार लाभार्थी असल्याचे सांगीतले तसेच जिल्हास्तरावर 30 हजार 600 कॉर्बोव्हॅक्स लस उपललब्ध झल्याचे सांगीतले

कार्यक्रमाचे संचालन विजय विसपुते यानी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अनुप कोठारी यानी व्यक्त केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here