13 वर्षीय मुलीची आणि पत्नीची हत्या नंतर पतीने केली ….

0
11

नागपूर : दिनांक 12 मार्च (प्रतिनिधी)

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला आहे. पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नागपुरातील राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. पती विलास गवते याने 13 वर्षीय मुलगी आणि 45 वर्षीय पत्नी रंजना गवते यांचा खून केला. त्यानंतर स्वतःच्याही आयुष्याची अखेर केली. पत्नी आणि मुलीचा गळा कापल्यानंतर विलासने गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

कौटुंबिक वादातून विलास गवते याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरात पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पती विलास गवते याने 45 वर्षीय पत्नी रंजना गवते आणि 13 वर्षीय मुलीचा खून केला. त्यानंतर स्वतःच्याही आयुष्याची अखेर केली. पतीने आधी पत्नी आणि मुलीचा गळा कापला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक वादातून विलास गवते याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here