महीला दिनी भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे महिला डॉक्टरांना आरोग्य मातृशक्ती पुरस्कार

0
8

नागपूर दिनांक 9 मार्च (महानगर प्रतिनिधी ) 

जागतिक महिला दिनानिमित्त  भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे महिलांसाठी लठ्ठपणा व हार्मोन्स संबंधी शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच यावेळी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्सला आरोग्य मातृशक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला गेला

स्वप्न भाजपाचे, मातृशक्तींच्या उत्तम आरोग्याचे ! हे ब्रीद साकारताना भाजपा वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त  या शिबिराचे आयोजन डॉ रवी वैरागडे यांचे राशीं खुश अरकेड,भारतीय विद्या भवन्स, श्रीकृष्ण नगर येथे करण्यात आले होते

भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात ,राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे  यांच्या हस्ते आरोग्य मातृशक्ती पुरस्कार वितरण करण्यात आले

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अध्यक्ष संजय अवचट,महिला मोर्चा अध्यक्ष सौ नीता ठाकरे,वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे उपस्थित होते

यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे महामंत्री आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ कोमल काशीकर, प्रसिद्ध होमिओतज्ञ डॉ रवी वैरागडे यांनी लठ्ठपणा, स्त्रियांमधील हार्मोन्स संबंधित समस्या यावर शिबिरात मार्गदर्शन केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ रवी वैरागडे यांच्यासह त्यांच्या टीमने परिश्रम घेतले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here