केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा नागपुरात भूमिपूजनाचा धडाका

0
12

नागपूर दिनांक 27 फरवरी  (महानगर प्रतिनिधी)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी नागपूर येथे तीन किमी लांबीच्या मनीष नगर ते खापरी ROB सिमेंट रस्त्याचे  भूमिपूजन केले. नवीन नागपूर म्हणून ओळख असलेल्या या भागात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर असावे, यासाठी गडकरीनी केंद्रीय रस्ते व इंन्फ्रास्ट्रक्चर निधीतून या कामाला मंजूरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी रहाटे कॅालनी ते खापरी ROB ६ किमी चौपदरी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केले.

केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी नागपूरच्या नवी शुक्रवारी येथे स्व. रामजीवन चौधरी क्रीडा संकुलाचे लोकार्पण केले. या क्रीडा संकुलामुळे महाल व परिसरातील नागरिकांना खेळाच्या अद्ययावत सुविधा मिळणार आहेत.

गडकरींनी शुक्रवारी तलाव टी-पॅाईंट ते अशोक चौक पर्यंतच्या चौपदरी सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन केले. या रस्त्यामुळे मध्य नागपुरातील वाहतुक सुगम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here