नागपूर,दि. 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी)
महापुरुष किंवा गडकिल्ल्यांची नावे देऊ नये
सर्व दुकाने व आस्थापनांचे फलक मराठी देवनागरीत असणे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे अ सेवाशर्तीचे विनियमन )अधिनियम 2017 नियम क्र.35 अन्वये बंधनकारक आहे. यासोबत मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळविले आहे.
ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरुषांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत अन्यथा अप्पर कामगार आयुक्तांच्या कार्यालयामार्फत कार्यवाही करण्यात येईल, आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.






