अंबाझरीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीचे घरून पलायन

0
9

नागपुर दिनांक 23 फरवरी (महानगर प्रतिनिधी)

अंबाझरीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीने घरून पलायन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकेबंदी करून पीडित १७ वर्षीय मुलीचा शोध सुरू केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मुलीने वडिलासोबत वाद घातला. वडिलाला धक्काबुक्की करून पसार झाली. नातेवाइकांनी शोध घेतला असता आढळून न आल्याने अंबाझरी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत शहरात नाकाबंदी करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

फैजान खान (वय २२) याने मुलीला २ फेब्रुवारीला भेटायला बोलविले. तिला जाफरनगरमधील मित्राच्या फ्लॅटवर नेले. तेथे एमडी देऊन सामूहिक अत्याचार केला. गेल्या आठवड्यात मुलीने अंबाझरी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी फैजान, साजिद, नुमान, तौसिफ, अमिन व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून चार ते पाच जणांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here