नागपुर दिनांक 20 फरवरी (प्रतिनिधी)
मारवाडी युवा मंच, राजस्थानी महिला मंडळ व माहेश्वरी महिला समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्माईली वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले.अध्यक्ष कनैया मंत्री, ललिता मंत्री,संगीता मंत्री यांनी सांगितले की या कार्यक्रमाचे प्रभारी रंजू चांडक, सुनंदा लढ्ढा, विद्या लढ्ढा, माधुरी मोदी होते. सचिव शुषमा डांगरा, व मंजु चांडक यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. स्पर्धेला तीन गटात विभाजित करून सहा संघ बनवण्यात आले होते. स्पर्धा राजस्थानी महिला मंडल येथून सुरू करण्यात आली. स्पर्धेत 250 लोकांनी सहभाग घेऊन आयोजन यशस्वी केले.
स्पर्धेचे उद्घाटन नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी, महेश बंग,डॉ.मनमोहन राठी, डॉ. गिरीधर हेडा यांच्याद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
स्पर्धेचे विजयी 40 वर्षापर्यंतच्या महिला गटात प्रथम स्थानी प्रियांका गुप्ता, द्वितीय स्थानी वेदिका मंत्री 40 वर्षापर्यंतच्या पुरुष गटात प्रथम स्थानी प्रशांत तलहर तर दुसऱ्या स्थानी गोविंद बिंझाणी राहिले.
40 ते 60 वर्षीय महिला गटात प्रथम स्थानी रेणू कौर सिद्धी द्वितीय स्थानी अस्मिता दुरुगकर तृतीय स्वाती कुलकर्णी राहिल्या तर सांत्वनपर पुरस्कार नितिषा कोपवानी यांना मिळाला. 40 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुष गटात प्रथम स्थानी नुरूल हक द्वितीय आलोक केला, तर मुकेश चांडक तृतीय स्थानी राहिले.
60 वर्षावरील महिला गटात तीन किलोमीटर मध्ये प्रथम स्थानी एकता गांधी जिथे स्थानिक सुशीला अग्रवाल राहिल्या 60 वर्षावरील सर्व स्पर्धकांना ज्यांनी कोण हेल्थकेअर यांच्याद्वारे प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. 60 वर्षावरील पुरुष गटात तीन किलोमीटर करिता प्रथम स्थानी विजय रेवतकर द्वितीय स्थानी रंगराज सिंह वर्मा राहिले या गटातील सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
60 वर्षावरील पुरुष गटाकरिता पाच किलोमीटर मध्ये प्रथम स्थानी अशोक मुंदडा हे होते या गटातील सर्व स्पर्धकांना प्रशांत पुरस्कार देण्यात आले.
तसेच यावेळी पवन मेहाडिया व बलदेव चावला यांना स्वर्गीय कृष्णालालजी बाहेती व स्वर्गीय रामदेवजी बाहेती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार होप हॉस्पिटल अंड आयुष्मान ऑफ ग्रुप, विप्र फाउंडेशन, स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हिंगणा, अल्का भागडिया, एशियन किडनी हॉस्पिटल चे डॉ. समीर चौबे, दिलीप मानेवाला, विक्की मी हार्डवेअर, हेअर हैबिट्स, युवान किड्स,हॉटेल सन स्टार यांच्याद्वारे प्रायोजित केले होते.
संचालन सरिता सारडा व शुभा धिरण यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला माजी अध्यक्षा प्रमिला मुनोद, मीना सांवल, उषा राठी विशेष उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिताअग्रवाल, आदित्य भैया, हेमंत शर्मा, राजेश चांडक, लालू चांडक, महेश बजाज, गिरीश पुरोहित, दीपक अग्रवाल, हरीश राठी, सचिन अग्रवाल, विजय जोशी, विजय सारडा, अश्विन अग्रवाल, विस्वजीत भगत, राज चांडक, सुनील डागा , हिमांशु चांडक ,मधुर बंग, प्रतीक बागड़ी,भावना कुलधारिया, सावित्री पचीसिया,कृष्ण सावल, ज्योति मंत्री,पूजा राठी,सुजाता मंत्री,पूनम बिंझानी,शांता सांवल, ज्योति कोठारी अंजू माहेश्वरी , अनीता पारेख, पूजा राठी ,ललिता कोठारी आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती प्रचार मंत्री पुनम झंवर यांनी दिली.






