अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, दोन्ही पुत्र सलील आणि ऋषिकेशला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

0
12

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत नवी भर पडली आहे.

अशातच आता आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA) न्यायालयाने आता अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांकडे वक्रदृष्टी वळविली आहे. विशेष न्यायालयाने शुक्रवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख, त्यांची दोन्ही मुले आणि संबंधितांना ५ एप्रिलपूर्वी न्यायालयसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत ईडीने विशेष न्यायालयात अनिल देशमुख, त्यांची मुले ह्रषिकेश व साहिल देशमुख आणि अन्य नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने शुक्रवारी संबंधितांना कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांना गेल्यावर्षी २ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. तेव्हापासून अनिल देशमुख तुरुंगातच आहेत. त्यांनी PMLA न्यायालयासमोर जामिनासाठी अनेक अर्ज केले. परंतु, प्रत्येकवेळी त्यांची विनंती फेटाळून लावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here