प. पू. सद्गुरूदास महाराजांच्‍या वाढदिवसानिमित्‍त 28 ला रक्‍तदान महायज्ञ 

0
15

नागपूर, 27 जानेवारी (प्रतिनीधी)

श्री दत्‍त संप्रदायातील थोर योगी ब्रह्मलीन विष्‍णुदास महाराजांचे अनुग्रहित शिष्‍य प. पू. सद्गुरूदास महाराज यांच्‍या 81 वाढदिवसानिमित्‍त शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सावरकर सभागृह, सावरकर नगर येथे सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रक्‍तदान महायज्ञ आयोजित करण्‍यात आला आहे.

प. पू. विष्‍णुदास महाराज अध्‍यात्‍म साधना केंद्र, छत्रपती सेवा प्रतिष्‍ठान, पत्रभेट परिवार आणि डॉ. हेडगेवार रक्‍तपेढी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होणा-या महायज्ञात विदर्भातील विविध ठिकाणच्‍या विष्‍णुदास स्‍वामी महाराज अध्‍यात्‍म साधताना केंद्रातील उपासक सहभागी होणार आहेत.

श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, छत्रपती शिव प्रतिष्‍ठान, सेवांकुर संस्था यांचेही महायज्ञासाठी सहकार्य लाभत आहे. या रक्‍तदान महायज्ञात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here