भीषण अपघात,नागपुरचे 4 ठार

0
12

नागपुर दिनांक 16 जनवरी ( प्रतिनिधि)

भिलवाडा येथून नागपूरला परतत असताना मोही घाटी गावाजवळ ट्रक आणि चारचाकी टवेरा (एमएच ४९/बी-२३८१) यांच्यात भीषण अपघात (Hit in the truck-tawera) झाला.

या अपघातात नागपुरातील पाचपावली संकुलातील रहिवासी असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू (Four killed in Road Accident) झाला. याशिवाय तीन जण गंभीर जखमी झाले आहे. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बयाबाई हरिदास नंदनवार (५६), मुलगा महेश नंदनवार (२९), मुलगी अर्चना गणेश खापरे (३३) आणि प्रमोद दशरथ धार्मिक (२२) अशी मृतांची नावे आहे. भोपाळ-नागपूर महामार्गावरील पांढुर्णा तालुक्याला लागून असलेल्या मोही घाटी गावात शनिवार-रविवार मध्यरात्री २.५५ मिनिटांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनास धडक (Hit in the truck-tawera) दिली.

धडक इतकी भीषण होती की त्यात वाहनाचा चुराडा झाला. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू (Four killed in Road Accident) झाला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून टवेरामध्ये अडकलेल्या शैलेश हरिदास नंदनवार (२८), गणेश वासुदेव खापरे (३७) आणि चालक ज्ञानेश्वर जांभूळकर यांना बाहेर काढून तत्काळ पांढुर्णा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर नागपूरला पाठविण्यात आले. नागपुरातील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ट्रकसह चालक फरार

गणेश वासुदेव खापरे यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे जखमींनी स्थानिक पोलिसांना सांगितले. ते नंदनवार कुटुंबाचे जावई आहेत. त्याच्या उपचारासाठी सर्वजण भिलवाडा येथे गेले होते. तेथून परतत असताना मोही घाटीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक (Hit in the truck-tawera) दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालकाचा शोध सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here