अनिल देशमुखांच्या घरावर इनकम टॅक्सची छापेमारी

0
9

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या.

आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here