प्रभाग ३४ मधील पाणी पुरवठा सुरळीत करा : स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती यांचे निर्देश

0
14

नागपूर, ता. ९: दक्षिण नागपुरातील प्रभाग ३४ मध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. प्रभाग ३४ मध्ये गत दोन वर्षांपासून अभिजीत नगर, श्रीकृष्ण नगर, मंगलदीप नगर-२ हा परिसर नॉन नेटवर्क एरिया आहे. या परिसरात ओंकार नगर पाण्याच्या टाकीमधून टाकलेले पाईपलाईन चार्ज करून तात्काळ नागरिकांना नळ कनेक्शन जोडून देण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे यांनी प्रशासनाला दिले दिले.

म्हाळगी नगर येथील पाण्याच्या टाकीमधून ज्या भागात पाणी येत आहे. त्या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. येथे सुरळीत दाबाने पाणी पुरवठा व्हावा सोबतच या परिसरात पाणी पुरवठ्याचा वेळही वाढविण्यात यावा. ज्या भागात पाईपलाईन टाकून झालेली आहे त्या भागात टाकीची निर्मिती होईपर्यंत नागरीकांना निदान एक दिवसआड पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून दररोजची नागरिकांची समस्या काही प्रमाणात दूर होईल, असेही ते म्हणाले.

नागरिकांना नियमित पाणी मिळावे या दिशेने लवकरात लवकर काम पूर्ण करून पाईप लाईन चार्ज करण्यात यावे. प्रभाग ३४ मधील बाधित परिसरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. येथील नळ जोडणी पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू केल्यास मनपाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असेही ते म्हणाले.

संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांच्या निर्देशानुसार दहाही झोनमधील अधिका-यांनी तात्काळ बैठक घेउन सुरळीत पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने कार्य करण्याचेही निर्देश राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here