विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

0
11

नागपूर दि. 07 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजोअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज 2019-20 साठी 15 सप्टेंबर 2021 व सन 2020-21 करीता नवीन अर्ज भरण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे.

कोविड-19 विषाणुच्या संसर्गामुळे काही महाविद्यालय बंद आहे. ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ एचटीटीपीएस कोलन स्लॅश महाडिबीटीएमएएचएआयटी डॉट जीओव्ही डॉट इन्‍ या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावे.

विभागातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here