चितारओळीमध्ये ११ पीओपी मूर्ती जप्त

0
9

नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे पीओपी मूर्तीच्या खरेदी व विक्रीवर बंदी असूनही काही मूर्ती विक्रेते पीओपी मूर्तींची विक्री करीत आहेत. यासंबंधी प्राप्त माहितीच्या आधारे मनपाच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (६ सप्टेंबर) चितारओळी परिसरात पीओपी मूर्ती विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाने ११ मूर्ती जप्त करुन ५६,००० रुपये दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात नुकतेच आदेश निर्गमित केले होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनीसुध्दा मनपा प्रशासनाला पीओपीची मूर्तींची विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने चितारओळी भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केली. गांधीबाग झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती झोनच्या आरोग्य अधिका-यांकडे सुपूर्द केल्या.

याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (६ सप्टेंबर) २ दुकाने/ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन १७,००० रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here