अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे? : राज ठाकरे

0
12

समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता, ‘अण्णा इतके दिवस होते कुठं?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला

राज ठाकरे यांनी आज मुंबईत सरकारवर हल्लाबोल केला. यात्रा, जत्रा, मेळावे बिनबोभाट होतात, मग सण-उत्सवांच्याच वेळी करोना कसा पसरतो? असा सवाल त्यांनी केला. राज्यातील मंदिरंही उघडली गेली पाहिजेत. अन्यथा, मनसे सर्व मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मागील काही वर्षांपासून अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केलेलं नाही. त्यामुळं अण्णा शांत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज यांनीही असाच प्रश्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here