मनसेसोबत युती करताना मुंबईचा विचार करावा लागेल: चंद्रकांत पाटील

0
34

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  आज भाजपा- मनसे युतीबद्दल बोलताना युती करताना सर्व विचार करावा लागेल असे सांगत युती होणार नसल्याचे संकेत दिले आहे

मी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली, तरीदेखील काही मुद्दे माझ्या मनात आहेत, त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट झाली होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here