मनसे सैनिकांनो महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करा : राज ठाकरे

0
12

महाराष्ट्रवर आलेले अस्मानी हे संकट मोठे आहे,त्याला आपल्याला तोंड द्यायचे आहे ,संकटाला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.जितकी जमेल तितकी मदत पूरग्रस्तांना करा असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केले आहे

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भीषण आहे. ह्या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. पूर जसजसा ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवा. योग्य त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीनं पोहोचेल याची काळजी घ्या. स्वत:चीही काळजी घ्या, पण महाराष्ट्रावरचं हे संकट मोठं आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये,’ असंही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here