मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठी १७ ते २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मुंबई मेट्रो रेलच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन नोटीफिकेशन डाऊनलोड करुन अर्ज करता येईल
उमेदवारांकडे वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असावा. नोकर भरतीची प्रवेश प्रक्रिया सुरु असताना दोन्ही सुरु असावेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे वैयक्तिक मुलाखत आणि इतर महत्वाची माहिती वैयक्तिक ईमेल आयडीवर पाठविण्यात येईल.
या पदासाठी ३५ हजार ते १ लाख ६० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. ही भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.






