शेवटी राज ठाकरे यांनी मास्क घातला,कारण समोर आल्यावर होत आहे राज ठाकरेची स्तुती

0
10

नाशिकनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांची एक भेट आणि फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे कारण पहिल्यांदा राज ठाकरे यांनी पहिल्यांदा मास्क घातले होते.राज यांनी मास्क घातल्याचे कारण समोर येताच त्यांची स्तुती होत आहे

राज ठाकरे यांनी पुण्यात  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट एकदम चर्चेत आली कारण पुरंदरे यांना भेटताना राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच  मास्क घातले होते

राज यांनी मास्क वापरला त्यामागे कारणही तसे खास होते. पुरंदरे यांचे घर पर्वती भागात असून तिथे पोहचल्यावर मास्क लावूनच राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. पुरंदरे यांचं वय व प्रकृतीच्या कुरबुरी या बाबी लक्षात घेत राज यांनी मास्कचा दंडक तिथे पाळला. तेथे दोहोंत काहीवेळ चर्चा रंगली. त्यानंतर राज तिथून निघाले. कारमध्ये बसताना राज यांनी आपल्या तोंडावरील मास्क काढला होता. उपस्थित सर्वांना हात उंचावून दाखवत राज तिथून निघाले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी राज यांनी मास्क लावल्याचे सांगण्यात येत आहे,हे कारण समोर येताच राज ठाकरे यांची स्तुती केल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here